जय देवा जय देवा जय धनाध्यक्षा । शिवमित्रा पौलस्त्या पिंगलि एकाक्षा ।। जय देवा जय देवा ।। धृ ।।
पद्म महापद्म शंख मकर । कच्छप मुकुंद वर्चस अन् नील । ऐशा महानिधींचा अधिपति तूं देव । उत्तरेचा स्वामी तूं लोकपाल ।।१।।
बालाजीच्या लग्ना धन तूं पुरविले । तिरूपतीगिरीवर देवा कायम वसविले । रघुराजास्तव केली तूंची धनवर्षा । राजाधीराजाच्या प्रगटसि आदर्शा ।।२।।
धनाधिपति तूं तुजला म्हणती कुबेर । जगपालक विष्णूचा अससी अवतार । ऋषिमुनी गंधर्वादि तुज ध्याती नित्य । वंदुनि तुजला गाती तुझेच स्तुतिस्तोत्र ।।३।।
सभेत तुझिया शोभती शिवशंकर अंबा । तुझिया अंकित झाली श्रीलक्ष्मी वरदा । भाग्यविधात्या देवा शरण तुझ्या चरणी । कृष्णभारतीस्वामी कर जोडुनी दोन्ही ।।४।।