।। आरती श्री गुरूदत्ताची ।।
आरती श्री गुरू दत्ताची, आरती गुरू माऊलीची। अत्री नंदना, करू वंदना, ज्योत ही परब्रह्माची।। धृ।।
दत्तरूप आहे निर्गुण, श्रीदत्ताचे चरण सगुण । अर्पुया हो तन मन धन, करू गुरूचे भजन पुजन । पंच प्राणाची, अन मोक्षाची, आरती वल्लभाची ।।१।।
गुरू चरित्र या हो आळवू, मन मंदिरी तया साठवू । सदा चिन्तनी नाम घोळवू, भक्ती प्रितीने अंग डोलवू । त्रिगुणाची, औदुंबराची, आरती अवधुताची ।।२।।
दया करावी गुरूदत्ता, अवघ्या अवनी तुमची सत्ता । या संसारी तरण्या आता मार्ग दाखवा आम्हास पुढचा । जन्म कृतार्थ, करी गुरूनाथ, श्रद्धा अंतरी दीनांची ।।३।।
गर्व हरा हो पतीतोद्धारा, तारावे या भवसंसारा । बाप तुम्ही आम्हा उद्धारा, द्यावा अंकी चरणी थारा । वंदन करीतो, चरणी नमितो, ऐका हाक पतीताची ।।४।।