।। आरती विठ्ठलाची ।।
येई हो विठ्ठले माझे माऊली ये । निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे ।।धृ.।।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरी आहे माझा मायबाप ।।१।।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।।२।।
असो नसो भाव आम्हा तुझीया ठाया । कृपा दृष्टी पाहे माझ्या पंढरीराया ।।३।।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी। विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ।।४।। येई हो विठ्ठले..।।