।। आरती कालभैरवाची ।।
जय जय रुद्र स्वरूपाची ।। धृ. ।।
कैलास शिखरी वास करीसी, शंकर जटेतुनी निघसी, पार्वती शरण गेलासी, दक्ष हो यज्ञासी, झाला अपमान शंकराचा जाण, दैत्या तुची मर्दिसी ।।१।।
शंकर आज्ञे हो निघसी, नंदी भुंगी रुत्सतुंडी, शिव सैन्या हो घेसी, जाऊनी दक्ष यज्ञासी, वरदान तू देसी ।।२।।
आजी आलो तुम्हा शरण, करा आमुचे रक्षण, जन्मअष्टमी पर्वकाळ, कांता शरण लागे चरणी, कृपा दृष्टी ठेवी साची ।।३।।