Loading...
+91 92840 73211
info@revapanchang.in
Follow Us:

|| जय जय त्र्यम्बकराज ।।

 

जय जय त्र्यम्बकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो । वृषभारूढा फणीभूषणा दशभुज पंचानना हो । विभूति माळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ।।धृ.।। 

पडले गोहत्येचे पातक गौतमऋषीच्या शिरी हो । त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरी हो। प्रसन्न होऊनि त्याते स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळि प्रगटे पावन त्रैलोक्याते करी हो ।। जय. ।।१।।

 धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णु किती हो । आणिकही बहु तीर्थे गंगाद्वारादिक पार्वती हो। वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीते पावती हो ।। जय. ।।२।।

 ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो। तै तै काया कष्टे जंव जंव चरणी रूपती खडे हो। तव तव पुण्यविशेषे किल्मिष अवघे त्यांचे झडे हो । केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो ।। जय. ।।३।।

 लावुनिया निजभजनी सकळही पुरविसि मनकामना हो । संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो। शिवशिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो । गोसावीनंदन विसरे संसार भव यातना हो ।। जय. ।।४।।