Loading...
+91 92840 73211
info@revapanchang.in
Follow Us:

।। कर्पूर गौरा गौरी शंकरा ।।

कर्पूर गौरा गौरी शंकरा, आरती करु तुजला । नामस्मरणे प्रसन्न होऊनी, पावसी भक्ताला ।।धृ।।

 ढवळा नंदी वाहन शोभे, अर्धांगी गौरी । जटा मस्तकी वास करीतसे, गंगा सुंदरी ।।१।।

 त्रिशुल डमरु शोभत हाती, गळा रुंड माळा । उग्र विषाते पिऊनी रक्षसी, देवा दिकपाला ।।२।।  

तृतीय नेत्री निघती क्रोधे, प्रळ्याग्नी ज्वाळा । नमीती सुरवर तुजला टैसे, शंकर तु भोळा ।।३।।

 सदया सगुणा गौरी रमणा, मम संकट भारी । मोरेश्वर सुत वासदेव हरी, स्मरतो अंतरी ।।४।। कर्पूर गौरा..