।। हेरंभ शिवकुल ।।
हेरंभ शिवकुल दीपका । तुज आरती गणनायका ||धृ||
सिंदुरासुर मर्दनि । सुरा सोडिले पाशातुन।। देवगण तुज वंदुनि । स्वस्थानी गेले हर्षुनी ।। धृ. १।।
दर्शने तव श्रीपती। मनःकामना सिद्धीस जाती । स्वयंः प्रकाशित तु गजवदना । निरांजन दिप काय तुला ।। धृ. २।।
मंगलारती गुंफुनी । हिं आरती द्वारकासुत गातो । आरती ओवाळीतो । आरती ओवाळीतो ।। धृ. ३।।
हेरंभ शिवकुल दिपका तुज आरती गणनायका ।।