Loading...
+91 92840 73211
info@revapanchang.in
Follow Us:

।। श्री गजानना ।।

श्री गजानना जय गजानना पार्वतीच्या सुकुमार रे । तुला मोदक आवडे फार रे..२

 सुंदर दिसतो । सिंहासनी बसतो.. २ शेंदुर चर्चितो लाल रे तुला ।। धृ. १।।

 दुर्वा हराळी बहु प्रेमाची ।.. २ मोदक भक्षितो फार रे तुला ।।धृ. २।। 

अग्र पुजेचा तु अधिकारी।..२ करी विघ्नांचा संहार रे तुला।।धृ. ३।।

 भाद्रपदाच्या शुद्ध चतुर्थिला ।..२ दरवर्षी येणार रे तुला ।।धृ.४।।

 एका जनार्दनी म्हणे रमापती ।..२ सेवक गुंफीतो हार रे । तुला मोदक आवडे फार रे.. तुला ।। धृ.५।।